Sunday, October 13, 2019

जनरल नॉलेज




एकूण जलसंपत्तीच्या किती टक्के
    *पाणी समुद्रात सामावलेले आहे  ?*

---  ९७ टक्के
--------------------------------------------
समुद्राचे पाणी कसे असते  ?

---  खारट
----------------------------------------------
पावसाळ्यात हवा कशी असते  ?

---  दमट
-----------------------------------------------
शरीराचे तापमान कशाने मोजतात  ?

---  तापमापीने
------------------------------------------------
खोबरेल तेल कोणत्या ऋतूत गोठते  ?

---  हिवाळ्यात
-----------------------------------------------
तापमापीमध्ये सामान्यतः  कोणता
      पदार्थ  वापरतात  ?*

---  पारा
--------------------------------------------- लीटर पाण्याचे वस्तुमान किती
     असते  ?

---  १ किलोग्रॅम
----------------------------------------------
 बेडकाचे अन्न कोणते  ?

---  कीटक
----------------------------------------------
फुलपाखराचे अन्न कोणते  ?

---  मकरंद  (मध )
----------------------------------------------
चर्मवाद्यांमध्ये चामड्याचे कंपन
       होऊन कशाची निर्मिती होते  ?

---  ध्वनी
-----------------------------------------------
 पृथ्वीवर पाणी किती अवस्थांमध्ये
        आढळते  ?

--- तीन
------------------------------------------------
 लाकूड अर्धवट जळल्यावर कोणता
        पदार्थ तयार होतो  ?

---  कोळसा
-----------------------------------------------
 द्रवाचे बाष्प होणे या क्रियेला काय
       म्हणतात  ?

---  बाष्पीभवन         
 =========================

Friday, October 11, 2019

अवांतर वाचन(जनरल नॉलेज)

(१) निर्धोक*
-- ज्यापासून धोका नाही असे.

*(२) नैसर्गिक*
--  निसर्गत:  मिळणारे.

*(३) भूगर्भ*
--  जमिनीच्या आतील भाग.

*(४) मानवनिर्मित*
--  माणसाने निर्माण केलेली.

*(५) मिठागर*
-- समुद्रकाठावरची मीठ तयार करण्याची जागा.

*(६) श्वासनलिका*
--  फुप्फुसांत हवा जाण्यासाठीची नळी.

*(७) जलशुद्धीकरण*
--  पाणी शुद्ध करण्याची प्रक्रिया.

*(८) निर्जंतुकीकरण*
--  जंतूचा नाश करण्याची प्रक्रिया.

*(९) उष्माघात*
-- सूर्याच्या उष्णतेने  शरीरावर होणारा दुष्परिणाम.

*(१०) चुंबकीय पदार्थ*
--- चुंबकाकडे आकर्षित होणारा पदार्थ.

*(११) सौरऊर्जा*
--- सूर्यापासून मिळणारी ऊर्जा.

*(१२) रोगजंतू*
---  रोगास कारणीभूत ठरणारे सूक्ष्मजीव.

*(१३) कुपोषण*
---  अन्नाची किंवा अन्नघटकांची कमतरता.

*(१४) जैविक*
---   जीव असलेले,  जीवविषयक.

*(१५) अजैविक*
---   जीव नसलेले.
 ==*

Saturday, August 31, 2019

मायेची पाखरे इयत्ता चौथी प्रश्न उत्तरे

१)पाहुण्यांनी अगोदर जेवायचे का नाकारले?
उत्तर-वसतिगृहाच्या मुलांनी केलेले जेवण चांगले नसेल, म्हणून पाहुण्यांनी जेवण नाकारले.
२) वसतिगृहातील मुलांवर अण्णांची माया कोणाप्रमाणे होती?
उत्तर-वसतिगृहातील मुलांवर अण्णांची माया आईवडिलांप्रमाणे होती.
३)अण्णा आयुष्यभर कोणाच्या शिक्षणासाठी झटत राहिले?
उत्तर-अण्णा आयुष्यभर गोरगरिबांच्या मुलांच्या शिक्षणासाठी झटत राहिले.
४) कर्मवीर भाऊरावांनी कोणत्या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शाळा सुरू केल्या?
उत्तर- कर्मवीर भाऊरावांनी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शाळा सुरू केल्या.

२) गाळलेल्या जागी योग्य शब्द भरा.
१) संस्थेच्या आवारात एक मोठे *वडाचे* झाड होते.
२)स्वत:ची *कांबळी* त्याच्या अंगावर घातली.
३)त्या मुलांपैकी कितीतरी जणांना *आई* नव्हती.
४)"अण्णा आपण खरेखुरे या मुलांचे *आईबाप* आहात".
५) त्यांच्या उत्तुंग कार्यामुळे भाऊरावांना सर्वजण *कर्मवीर* म्हणून ओळखतात.

३) कोण, कोणाला म्हणाले?
१) आता इथेच मुक्काम करा
उत्तर भाऊराव लेखकाला म्हणाले.
२)जारे स्वैपाकघरात काही शिल्लक असेल ते घेऊन ये बघू
उत्तर-असे भाऊराव एका मुलाला म्हणाले.
३) आपणास उदंड आयुष्य लाभो
उत्तर-असे लेखक भाऊरावांना म्हणाले.


 थोडक्यात उत्तरे लिहा.

१) लेखक उपाशी आहेत हे समजल्यावर भाऊरावांनी काय केले?
उत्तर-लेखक उपाशी आहेत हे समजल्यावर अण्णांनी एका मुलाला आज्ञा केली.ते म्हणाले जा रे स्वयंपाकघरात काही शिल्लक असेल ते घेऊन ये मुलगा धावत स्वयंपाकघरात गेला.आणि पिठले, भाकरी ,कांदा व तेल एका ताटात घेऊन आला.

२) मध्यरात्रीनंतर कोणता प्रसंग घडला?
उत्तर-कडाक्याची थंडी होती.मध्यरात्रीनंतर अण्णा उठले.कंदील हातात घेतला.वसतिगृहातील प्रत्येक मुलाला झोप लागली की नाही.त्यांच्या अंगावर पांघरूण आहे की नाही हे त्यांनी पाहिले.एक मुलगा थंडीने कुडकुडत असलेला त्यांना दिसला. अण्णांनी त्याला दोन्ही हातांनी अलगद उचलले.स्वत:च्या बिछान्यावर आणून झोपवले.स्वत:ची कांबळी त्याच्या अंगावर घातली त्याला पोटाशी धरले.तो मुलगा अण्णांच्या उबेत गाढ झोपी गेला.

मूल्यवर्धन वर केलेली कविता

मूल्यवर्धन कविता
मूल्यांचे शिक्षण  मूल्यवर्धन
स्व ची जाणिव ओळखूया
जबाबदारी चा हा स्विकार
आपल्या मनामनात जपूया(१)
मन बरेच काही सांगून जाते
समोरच्यांचे पाहून दुःख आनंद
एकमेकाना ओळखता येईल
अशाच भावनांचा घेऊ सर्वानंद(२)
आपण जरी ठामनपा व नमनपा
असलो तरी ध्येय मात्र एक आहे
समोर‌  असलेल्या  बालकांचे
उद्दिष्टे मात्र  एकच आहे (३)
चिमुकल्या पाखरांची किमया
आपण जोपासूया सदैव तत्पर
 हीच पाखरे घेतील जबाबदारी
उद्याची कर्तव्ये आत्मनिर्भर (४)
प्रवास कधी संपत नाही
आपण सदैव चालत राहू
नवनवीन त्या प्रशिक्षणाचे
पाईक आपण होत जाऊ (५)

Monday, June 24, 2019

Words (Rain)

पाऊस (Rain), रिमझिम (किंवा झिमझिम) पाऊस (Drizzle), पर्जन्य (Rainfall), पावसाच्या धारा (किंवा सरी) (Rain Showers), मुसळधार पाऊस (Heavy Rain)/(Heavy Downpour)/(Torrential Rain), पावसाची रिपरिप/पिरपिर (Incessant Light Rain), संततधार/पावसाची झड (Incessant Heavy Rain),  शिरवे/धावता पाऊस (Passing Showers), गारांचा पाऊस/गारपीट (Hailstorm), अतिवृष्टी (Excessive Rainfall), हिमवर्षा (Snowfall), हिमवर्षाव (Rain of Snow Flakes), बर्फमिश्रित पाण्याचा पाऊस (Sleet), हिमवादळ (Snow Storm), हलका पाऊस (Light Rain), तुरळक पाऊस (Isolated Rainfall,), विखुरलेला पाऊस (Scattered Rain), थांबून थांबून पडणारा पाऊस (Intermittent Rain), सार्वत्रिक पाऊस (Widespread Rain), गडगडाटी पाऊस/मेघगर्जनेसहित पाऊस (Thunder Showers), वादळी पाऊस/पावसाचे वादळ (Stormy Rain/Rain Storm), मोसमी पाऊस (Monsoon), नैर्ऋत्य मोसमी पाऊस (Southwest Monsoon), ईशान्य मोसमी पाऊस/हस्ताचा पाऊस, (Northeast Monsoon, Post-Monsoon), उन्हाळी पाऊस (Summer Rain), हिवाळी पाऊस (Winter Rain), बारमाही पाऊस (Year Long Rain), अवकाळी (किंवा अवकाळ्या) पाऊस (Un-seasonal Rain), रात्रीचा पाऊस (Night Rain), धडकवणी/मृगाचा पाऊस/वळवाचा पाऊस/वळीव (Pre-Monsoon showers), सरासरी पाऊस/पर्जन्यमान (Average Rainfall), वार्षिक पाऊस (Annual Rainfall), पर्जन्यछाया/पर्जन्य छायेचा प्रदेश (Rain Shadow), पावसाळी दिवस (Rainy Day), उत्तरेचा पाऊस (Northerly Rain); कृत्रिम पाऊस (Artificial Rain), ढग फवारणी/मेघारोपण/मेघबीजन (Cloud seeding), ढगफुटी (Cloudburst), अवकाळी पाउस

इयत्ता आठवी विषय इतिहास धडा पहिला इतिहासाची साधने रिकाम्या जागा भरा.

(१) इतिहासाच्या साधनांमधील ......... साधने आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहेत.  (अ) लिखित  ( ब ) मौखिक  (क )भौतिक  ( ड ) दृकश्राव्य २) पुण्यात...