Friday, October 11, 2019

अवांतर वाचन(जनरल नॉलेज)

(१) निर्धोक*
-- ज्यापासून धोका नाही असे.

*(२) नैसर्गिक*
--  निसर्गत:  मिळणारे.

*(३) भूगर्भ*
--  जमिनीच्या आतील भाग.

*(४) मानवनिर्मित*
--  माणसाने निर्माण केलेली.

*(५) मिठागर*
-- समुद्रकाठावरची मीठ तयार करण्याची जागा.

*(६) श्वासनलिका*
--  फुप्फुसांत हवा जाण्यासाठीची नळी.

*(७) जलशुद्धीकरण*
--  पाणी शुद्ध करण्याची प्रक्रिया.

*(८) निर्जंतुकीकरण*
--  जंतूचा नाश करण्याची प्रक्रिया.

*(९) उष्माघात*
-- सूर्याच्या उष्णतेने  शरीरावर होणारा दुष्परिणाम.

*(१०) चुंबकीय पदार्थ*
--- चुंबकाकडे आकर्षित होणारा पदार्थ.

*(११) सौरऊर्जा*
--- सूर्यापासून मिळणारी ऊर्जा.

*(१२) रोगजंतू*
---  रोगास कारणीभूत ठरणारे सूक्ष्मजीव.

*(१३) कुपोषण*
---  अन्नाची किंवा अन्नघटकांची कमतरता.

*(१४) जैविक*
---   जीव असलेले,  जीवविषयक.

*(१५) अजैविक*
---   जीव नसलेले.
 ==*

No comments:

Post a Comment

इयत्ता आठवी विषय इतिहास धडा पहिला इतिहासाची साधने रिकाम्या जागा भरा.

(१) इतिहासाच्या साधनांमधील ......... साधने आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहेत.  (अ) लिखित  ( ब ) मौखिक  (क )भौतिक  ( ड ) दृकश्राव्य २) पुण्यात...