Saturday, August 31, 2019

मूल्यवर्धन वर केलेली कविता

मूल्यवर्धन कविता
मूल्यांचे शिक्षण  मूल्यवर्धन
स्व ची जाणिव ओळखूया
जबाबदारी चा हा स्विकार
आपल्या मनामनात जपूया(१)
मन बरेच काही सांगून जाते
समोरच्यांचे पाहून दुःख आनंद
एकमेकाना ओळखता येईल
अशाच भावनांचा घेऊ सर्वानंद(२)
आपण जरी ठामनपा व नमनपा
असलो तरी ध्येय मात्र एक आहे
समोर‌  असलेल्या  बालकांचे
उद्दिष्टे मात्र  एकच आहे (३)
चिमुकल्या पाखरांची किमया
आपण जोपासूया सदैव तत्पर
 हीच पाखरे घेतील जबाबदारी
उद्याची कर्तव्ये आत्मनिर्भर (४)
प्रवास कधी संपत नाही
आपण सदैव चालत राहू
नवनवीन त्या प्रशिक्षणाचे
पाईक आपण होत जाऊ (५)

No comments:

Post a Comment

इयत्ता आठवी विषय इतिहास धडा पहिला इतिहासाची साधने रिकाम्या जागा भरा.

(१) इतिहासाच्या साधनांमधील ......... साधने आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहेत.  (अ) लिखित  ( ब ) मौखिक  (क )भौतिक  ( ड ) दृकश्राव्य २) पुण्यात...