Saturday, April 15, 2017

निरोप समारंभ इयत्ता आठवी

*निरोप समारंभ*
सुखदुखाच्या वाटेवर
अभ्यासाच्या वळणावर
जाणार आहात तुम्ही माझ्या
 मुलांनो लक्षात ठेवा तुम्ही (१)

पर्वत डोंगर टेकड्या चढून
सदैव पुढेच जायचे असते
प्रगतीचे एक पाऊल मात्र
सदैव पुढेच टाकायचे (२)

मी कोण आहे ? कोण होणार आहे?
याचे भान ठेवायचे असते
सर्वाना आवडेल असेच मात्र
वागायचे असते(३)

नम्रतेने पुढे जा
विश्वास नेहमी संपादन करा
पाऊल पडणार आहे तुमचे
सामर्थ्याने जगायचेच(४)

अशी पाखरे येती आणि
स्मृती ठेऊनी जाती
लळा आम्हा लाविती
विचारशील प्रगती(५)

मी मात्र तुमची भरारी
घेतलेली पाहीन
तुमच्यासाठी काहीपण
वसा मी घेईन(६)

या पाखरांनो पुन्हा परतूनि या
चालणा-या वाटेवर हाक मारत जा
चुकले असेल माझे काही
माफ करून जा (७)

सांगेन मात्र एवढेच
खूप मोठे व्हा
मी नेहमी मला
तुमच्यात पाहिन (८)

सौ.शारदा चौधरी ठाणे
मनपा शाळा क्रमांक ९५ काजुवाडी

3 comments:

  1. अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवुनी जाती ....
    दोन दिसांची रंगत संगत दोन दिसांची
    नाती...



    खूप छान ताई कार्यक्रम ....

    ReplyDelete
  2. अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवुनी जाती ....
    दोन दिसांची रंगत संगत दोन दिसांची
    नाती...



    खूप छान ताई कार्यक्रम ....

    ReplyDelete

इयत्ता आठवी विषय इतिहास धडा पहिला इतिहासाची साधने रिकाम्या जागा भरा.

(१) इतिहासाच्या साधनांमधील ......... साधने आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहेत.  (अ) लिखित  ( ब ) मौखिक  (क )भौतिक  ( ड ) दृकश्राव्य २) पुण्यात...