Saturday, April 22, 2017

हाक

*हाक*
बाबा परतोनि या हो तुम्ही
वाट पाहते मी छकुली (धृ)
आवाज तुमचा येता कानी
भास होतसे मजला मनी
कशी समजवू मजला हो
 ही हाक मारिते  तुम्हा हो (१)
बेटा हा शब्द  कानी पडता
मन हे रडते हाक मारता
कशी सय येते रोज तुमची
या ना हो तुम्ही परतोनि(२)
कौतुक  मजला वाटे तुमचे
रोज धडे हे शिकवणीचे
आठवण मज ती बालपणीची
या ना हो तुम्ही भेटाया  (३)
धडे हे तुमचे साठवणीचे
वाटे मजला अतिमोलाचे
शिकवण साधी  तुमची हो
समजायला ही सोपी हो(४)
अश्रू ही साथ देई मजला
कशी थांबवू मी डोळ्यांना
लेक लाडकी मी तुमची हो
या हो मज तुम्ही भेटाया(५)

सौ शारदा चौधरी ठाणे मनपा शाळा क्रमांक ९५

कणा

*कणा*
कणा मिळाला मजबूत
मायेचा अन छायेचा
कणा मिळाला भावाचा
प्रेमाचा अन आधाराचा
कणा मिळाला मैत्रीचा
सुखदुखाच्या जीवनाचा
कणा मिळाला साथीचा
प्रेमाचा अन त्यागाचा
कणा मिळाला वडाचा
आधार अन मजबूतीचा
कणा मिळाला समाजाचा
स्वातंत्र्य आणि समतेचा
कणा मिळाला भावनेचा
जीवन सुखी करण्याचा
कणा मिळाला नम्रतेचा
सद्गुणी बनुनी वागण्याचा
कणा मिळाला शिक्षकाचा
विद्यार्थी जीवन घडवण्याचा
 
 सौ.शारदा चौधरी ठाणे मनपा शाळा क्रमांक ९५

अपुल्या हातात काय असत?

*अपुल्या हातात काय असतं?*

फुलणं आणि फुलवणं अपुल्या हातात असत
जगणंआणि जगवणं  अपुल्या हातात असत
सजणं आणि सजवणं अपुल्या हातात असत
वागणं आणि वागवणं  आपुल्या हातात असत
उठणं आणि उठवणं अपुल्या हातात असत
काम करणं करवून घेणे अपुल्या हातात असत
चकणं आणि चकवणं अपुल्या हातात असत
वाढणं आणि वाढवणं अपुल्या हातात असत
वाकणं आणि वाकवणं अपुल्या हातात असत
चालणं आणि चालवणं अपुल्या हातात असत
वळणं आणि वळवणं अपुल्या हातात असत
वाचणं आणि वाचवणं अपुल्या हातात असत
घडणं आणि घडवणं अपुल्या हातात असत

सौ.शारदा चौधरी ठाणे मनपा शाळा क्रमांक ९५

पाणी

पाणी
पाण्यासाठी वणवण फिरते प्रजा ही सारीे
थेंबाथेंबातूनी वाचवा हो पाणी हो पाणी(धृ)
पाणी आपुले जीवन आहे सांगे जीवनगाथा
वाचवुनि संपवू या आपण पाण्याची व्यथा(१)
दुनिया सांगे व्यथा अपुली पाण्याची न्यारी
बचत पाण्याची करूया आपण प्रजा ही सारी (२)
विहिरीतुनी हे पाणी आणिती दूर दूर जातांना
करू आपण त्यांच्यासाठी पाणी वाचवतांना(३)
 सकलजन वाचवू आपण ही आपली प्रथा
सुटेल तंटा पाण्याचा ही देशाची व्यथा(४)
इथे नाही पाणी आणि तिथे नाही पाणी
पाण्यासाठी येतात हो ओठावर गाणी(५)
पाणी पाणी हा आक्रोश करिती प्रजा ही सारी
पाणी वाचवुनि हो आपण करू दुनियादारी(६)
 डोळ्यातुनि हे पाणी येते रडते दुनिया सारी
पाण्याचा हा फरक कळू दे वाचवू पाणी पाणी(७)
ज्याला पाणी मिळत नाही हो एेका ती कहाणी
त्यांच्यासाठी वाचवूया आपण थेंबथेंब पाणी (८)
सकलजन करिती सारे पाण्याची विनवणी
थेंबाथेंबातूनी बनवू सागर होईल पाणी(९)

     सौ.शारदा चौधरी
ठाणे मनपा शाळा क्रमांक ९५

Wednesday, April 19, 2017

नाती गोती

नातीगोती

 घरासारखे घर अन भिंती असती
नाही आता त्यामधे नाती गोती
आई आणि बाबा अन मुल दिसती
नाही कोणी मोठा  त्यांच्यासोबती(१)
घरी आल्यावर मुले सोबत मागती
आजी आजोबा सम कोणी नसती
आई बाबा सारखे लाड करीती
सोबतीला सवयींना खाद्य पुरविती(२)
आजी असती घरचे जेवण देती
नाही समजत नाती अन गोती
 जीवनाचे अर्थ सारे संपून गेले
उदासीपण आता जीवनात आले(३)
नाही नाती गोती  नाही जिव्हाळा
कधी कळणार आयुष्याचा ताळा
आपुल्या जगण्याला घाला आळा
कधी कळणार हे सत्य कुणाला(४)
सांभाळा आता आजीआजोबाला
जीवन होईल सुखी मंत्र हा नवा
जीवनाचे सार कोणा  समजले
त्यांच्या घरी नातीगोती आले(५)

                 सौ.शारदा चौधरी
      ठाणे मनपा शाळा क्रमांक९५

Saturday, April 15, 2017

निरोप समारंभ इयत्ता आठवी

*निरोप समारंभ*
सुखदुखाच्या वाटेवर
अभ्यासाच्या वळणावर
जाणार आहात तुम्ही माझ्या
 मुलांनो लक्षात ठेवा तुम्ही (१)

पर्वत डोंगर टेकड्या चढून
सदैव पुढेच जायचे असते
प्रगतीचे एक पाऊल मात्र
सदैव पुढेच टाकायचे (२)

मी कोण आहे ? कोण होणार आहे?
याचे भान ठेवायचे असते
सर्वाना आवडेल असेच मात्र
वागायचे असते(३)

नम्रतेने पुढे जा
विश्वास नेहमी संपादन करा
पाऊल पडणार आहे तुमचे
सामर्थ्याने जगायचेच(४)

अशी पाखरे येती आणि
स्मृती ठेऊनी जाती
लळा आम्हा लाविती
विचारशील प्रगती(५)

मी मात्र तुमची भरारी
घेतलेली पाहीन
तुमच्यासाठी काहीपण
वसा मी घेईन(६)

या पाखरांनो पुन्हा परतूनि या
चालणा-या वाटेवर हाक मारत जा
चुकले असेल माझे काही
माफ करून जा (७)

सांगेन मात्र एवढेच
खूप मोठे व्हा
मी नेहमी मला
तुमच्यात पाहिन (८)

सौ.शारदा चौधरी ठाणे
मनपा शाळा क्रमांक ९५ काजुवाडी

Thursday, April 13, 2017

*निरोप समारंभ*

*निरोप समारंभ*
सुखदुखाच्या वाटेवर
अभ्यासाच्या वळणावर
जाणार आहात तुम्ही माझ्या
 मुलांनो लक्षात ठेवा तुम्ही (१)

पर्वत डोंगर टेकड्या चढून
सदैव पुढेच जायचे असते
प्रगतीचे एक पाऊल मात्र
सदैव पुढेच टाकायचे (२)

मी कोण आहे ? कोण होणार आहे?
याचे भान ठेवायचे असते
सर्वाना आवडेल असेच मात्र
वागायचे असते(३)

नम्रतेने पुढे जा
विश्वास नेहमी संपादन करा
पाऊल पडणार आहे तुमचे
सामर्थ्याने जगायचेच(४)

अशी पाखरे येती आणि
स्मृती ठेऊनी जाती
लळा आम्हा लाविती
विचारशील प्रगती(५)

मी मात्र तुमची भरारी
घेतलेली पाहीन
तुमच्यासाठी काहीपण
वसा मी घेईन(६)

या पाखरांनो पुन्हा परतूनि या
चालणा-या वाटेवर हाक मारत जा
चुकले असेल माझे काही
माफ करून जा (७)

सांगेन मात्र एवढेच
खूप मोठे व्हा
मी नेहमी मला
तुमच्यात पाहिन (८)

सौ.शारदा चौधरी ठाणे
मनपा शाळा क्रमांक ९५ काजुवाडी

इयत्ता आठवी विषय इतिहास धडा पहिला इतिहासाची साधने रिकाम्या जागा भरा.

(१) इतिहासाच्या साधनांमधील ......... साधने आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहेत.  (अ) लिखित  ( ब ) मौखिक  (क )भौतिक  ( ड ) दृकश्राव्य २) पुण्यात...