Saturday, August 31, 2019

मायेची पाखरे इयत्ता चौथी प्रश्न उत्तरे

१)पाहुण्यांनी अगोदर जेवायचे का नाकारले?
उत्तर-वसतिगृहाच्या मुलांनी केलेले जेवण चांगले नसेल, म्हणून पाहुण्यांनी जेवण नाकारले.
२) वसतिगृहातील मुलांवर अण्णांची माया कोणाप्रमाणे होती?
उत्तर-वसतिगृहातील मुलांवर अण्णांची माया आईवडिलांप्रमाणे होती.
३)अण्णा आयुष्यभर कोणाच्या शिक्षणासाठी झटत राहिले?
उत्तर-अण्णा आयुष्यभर गोरगरिबांच्या मुलांच्या शिक्षणासाठी झटत राहिले.
४) कर्मवीर भाऊरावांनी कोणत्या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शाळा सुरू केल्या?
उत्तर- कर्मवीर भाऊरावांनी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शाळा सुरू केल्या.

२) गाळलेल्या जागी योग्य शब्द भरा.
१) संस्थेच्या आवारात एक मोठे *वडाचे* झाड होते.
२)स्वत:ची *कांबळी* त्याच्या अंगावर घातली.
३)त्या मुलांपैकी कितीतरी जणांना *आई* नव्हती.
४)"अण्णा आपण खरेखुरे या मुलांचे *आईबाप* आहात".
५) त्यांच्या उत्तुंग कार्यामुळे भाऊरावांना सर्वजण *कर्मवीर* म्हणून ओळखतात.

३) कोण, कोणाला म्हणाले?
१) आता इथेच मुक्काम करा
उत्तर भाऊराव लेखकाला म्हणाले.
२)जारे स्वैपाकघरात काही शिल्लक असेल ते घेऊन ये बघू
उत्तर-असे भाऊराव एका मुलाला म्हणाले.
३) आपणास उदंड आयुष्य लाभो
उत्तर-असे लेखक भाऊरावांना म्हणाले.


 थोडक्यात उत्तरे लिहा.

१) लेखक उपाशी आहेत हे समजल्यावर भाऊरावांनी काय केले?
उत्तर-लेखक उपाशी आहेत हे समजल्यावर अण्णांनी एका मुलाला आज्ञा केली.ते म्हणाले जा रे स्वयंपाकघरात काही शिल्लक असेल ते घेऊन ये मुलगा धावत स्वयंपाकघरात गेला.आणि पिठले, भाकरी ,कांदा व तेल एका ताटात घेऊन आला.

२) मध्यरात्रीनंतर कोणता प्रसंग घडला?
उत्तर-कडाक्याची थंडी होती.मध्यरात्रीनंतर अण्णा उठले.कंदील हातात घेतला.वसतिगृहातील प्रत्येक मुलाला झोप लागली की नाही.त्यांच्या अंगावर पांघरूण आहे की नाही हे त्यांनी पाहिले.एक मुलगा थंडीने कुडकुडत असलेला त्यांना दिसला. अण्णांनी त्याला दोन्ही हातांनी अलगद उचलले.स्वत:च्या बिछान्यावर आणून झोपवले.स्वत:ची कांबळी त्याच्या अंगावर घातली त्याला पोटाशी धरले.तो मुलगा अण्णांच्या उबेत गाढ झोपी गेला.

मूल्यवर्धन वर केलेली कविता

मूल्यवर्धन कविता
मूल्यांचे शिक्षण  मूल्यवर्धन
स्व ची जाणिव ओळखूया
जबाबदारी चा हा स्विकार
आपल्या मनामनात जपूया(१)
मन बरेच काही सांगून जाते
समोरच्यांचे पाहून दुःख आनंद
एकमेकाना ओळखता येईल
अशाच भावनांचा घेऊ सर्वानंद(२)
आपण जरी ठामनपा व नमनपा
असलो तरी ध्येय मात्र एक आहे
समोर‌  असलेल्या  बालकांचे
उद्दिष्टे मात्र  एकच आहे (३)
चिमुकल्या पाखरांची किमया
आपण जोपासूया सदैव तत्पर
 हीच पाखरे घेतील जबाबदारी
उद्याची कर्तव्ये आत्मनिर्भर (४)
प्रवास कधी संपत नाही
आपण सदैव चालत राहू
नवनवीन त्या प्रशिक्षणाचे
पाईक आपण होत जाऊ (५)

इयत्ता आठवी विषय इतिहास धडा पहिला इतिहासाची साधने रिकाम्या जागा भरा.

(१) इतिहासाच्या साधनांमधील ......... साधने आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहेत.  (अ) लिखित  ( ब ) मौखिक  (क )भौतिक  ( ड ) दृकश्राव्य २) पुण्यात...