Saturday, September 11, 2021

इयत्ता सहावी, सामान्य विज्ञान स्वाध्याय १.नैसर्गिक संसाधने - हवा,पाणी आणि जमीन

इयत्ता सहावी, सामान्य विज्ञान स्वाध्याय

 १.नैसर्गिक संसाधने - हवा,पाणी आणि जमीन 


प्रश्न १. ला रिकाम्या जागी योग्य शब्द भरा.

अ)ओझोन वायूचा थर सूर्यापासून पृथ्वीवर येणारी .................. किरणे शोषून घेतो.

उत्तर: ओझोन वायूचा थर सूर्यापासून पृथ्वीवर येणारी अतिनील किरणे शोषून घेतो.

आ) पृथ्वीवर गोड्या पाण्याचा एकूण .......... टक्के साठा उपलब्ध आहे.

उत्तर: पृथ्वीवर गोड्या पाण्याचा एकूण ०.०३ टक्के साठा उपलब्ध आहे.

इ)मृदेमध्ये .............. व ................ घटकांचे अस्तित्व असते.

उत्तर : मृदेमध्ये जैविक व अजैविक घटकांचे अस्तित्व असते.

 

प्रश्न २. रा असे का म्हणतात?

अ)ओझोन थर पृथ्वीचे संरक्षक कवच आहे.

उत्तर:१) वातावरणाच्या स्थितांबर या थराच्या खालच्या भागात ओझोन वायूचा थर आढळतो.

२) सूर्यापासून येणारी अतिनील किरणे सजीवांसाठी हानिकारक असतात.

३) ही अतिनील किरणे ओझोन वायूचा थर शोषून घेतो.

४) त्यामुळे पृथ्वीवरील सजीवांचे रक्षण होते. म्हणून 'ओझोन थर हा पृथ्वीचे संरक्षक कवच आहे.' असे म्हणतात.

आ)पाणी हे जीवन आहे.

उत्तर:१)पाण्याशिवाय या पृथ्वीवर कोणताही सजीव जगू शकत नाही.

२)प्राण्यांमधील रक्त, वनस्पतींमध्ये असणारी रसद्रव्ये यांमध्ये देखील पाण्याचे प्रमाण सर्वाधिक असते.

३) सजीव शरीराच्या सर्व क्रिया सुलभ चालाव्यात म्हणून सजीवांना जगण्यासाठी रोज पाणी पिण्याची गरज असते.म्हणून ' पाणी हे जीवन आहे.' असे म्हणतात.

इ)समुद्राचे पाणी पिण्यायोग्य नसले तरी उपयुक्त आहे.

उत्तर :१) समुद्रातील पाण्याचे बाष्पीभवन झाल्यामुळे पाऊस पडतो हेच पाणी पिण्यासाठी वर्षभर जलाशय किंवा कूपनलिका यांत साठवून ठेवता येते.

२)मासेमारी, हवामान, पाऊस तसेच संपूर्ण ऋतुचक्र व जलचक्र हे समुद्रावरच अवलंबून असते.

३) समुद्राच्या पाण्यात अनेक जलचर असतात यापैकी काही मासे,शिंपले, यांसारखे जलचरांचा उपयोग माणूस अन्न म्हणून करतो.

४)समुद्रकिनाऱ्यावर राहणाऱ्या लोकांचे मासेमारी हे उपजीविकेचे साधन आहे.

५) मीठ, आयोडीन आणि इतर काही खनिजे ही समुद्राच्या पाण्यापासून मिळवली जातात. समुद्राच्या तळाशी मौल्यवान मोती सापडतात. समुद्रात जीवाश्म इंधनाचे साठे सापडले आहेत.

६) समुद्रातूनच कमी खर्चात जलवाहतूक केली जाते.

७)आज समुद्राच्या पाण्यापासून पिण्यायोग्य पाणी बनवण्याचे तंत्रज्ञान विकसित झाले आहे. म्हणून समुद्राचे पाणी पिण्यायोग्य नसले तरी उपयुक्त आहे.

८)समुद्राच्या लाटांचा वापर करून प्रगत देशांत ऊर्जानिर्मिती केली जाते.


प्रश्न ३. रा काय होईल ते सांगा?

अ)मृदेतील सूक्ष्मजीव नष्ट झाले.

उत्तर: १)मृत वनस्पती व प्राणी यांचे सूक्ष्मजीवांमार्फत विघटन होऊन कुथित मृदा तयार होते.

२) कुथित मृदा जमिनीला पोषक घटक पुरवते व हवा खेळती ठेवते. तसेच मातीत पाणी ठेवण्यासाठी महत्वाची असते.

३) काही सूक्ष्मजीवांमुळे खडकाचा अपक्षय होतो.

४)मृदेतील सारे सूक्ष्मजीव नष्ट झाले तर विघटन आणि अपक्षय या दोन्ही प्रक्रिया थांबतील. या प्रक्रियेतून  तयार होणारी कृथितमृदा तयार होणार नाही.कुथित मृदेअभावी व पाण्याअभावी सजीव सृष्टी धोक्यात येईल.

आ)तुमच्या परिसरात वाहने व कारखान्यांची संख्या वाढली.

उत्तर: १)वाहने तसेच कारखाने यांमध्ये जीवाश्म इंधनाचा वापर केला जातो. ही जीवाश्म इंधने जळल्याने हवेत घातक घटक सोडले जातात.नायट्रोजन,कार्बन डायऑक्साईड ,सल्फर डायऑक्साईड,कार्बन मोनोऑक्साईड यांसारख्या विषारी वायूंमुळे पर्यावरणावर आणि मानवी आरोग्यावर  विपरीत परिणाम घडून येतात. 

२)कारखान्यातून आणि वाहनातून बाहेर पडणारा धूर थेट वातावरणातील हवेत मिसळतो. त्यामुळे हवेतील घटकांचा समतोल बिघडतो यालाच वायू प्रदूषण असे म्हणतात. वाहने आणि कारखान्यांची संख्या वाढल्याने परिसरातील वायू प्रदुषणात वाढ होऊन हवा दूषित होते. त्यामुळे सजीव सृष्टी धोक्यात येते.

इ)पिण्याच्या पाण्याचा संपूर्ण साठा संपला.

उत्तर: १) पाण्याशिवाय या पृथ्वीवर कोणताही सजीव जगू शकत नाही.

२) प्राण्यांमधील रक्त, वनस्पतींमध्ये असणारी रसद्रव्ये यांमध्ये देखील पाण्याचे प्रमाण सर्वाधिक असते.

३) कोणत्याही सजीवाला पाण्याशिवाय जिवंत राहणे शक्य नाही. म्हणून पाण्याला ‘जीवन’ असे म्हणतात.

पृथ्वीवरील पाण्याचा साठा संपला तर पृथ्वीवरील सजीव सृष्टीचे अस्तित्व संपुष्टात येईल.


प्रश्न ४.था सांगा मी कोणाशी जोडी लावू?

उत्तरे

'अ' गट - 'ब' गट 

१)कार्बनडायऑक्साईड - इ) वनस्पती व अन्ननिर्मिती

२)ऑक्सिजन - ई)ज्वलन

३)बाष्प - आ)पाऊस

४)सूक्ष्मजीव - अ)मृदेची निर्मिती


प्रश्न ५. वा नावे लिहा.

अ)जीवावरणाचे भाग

उत्तर: शिलावरण,जलावरण, वातावरण.(प्राणी आणि वनस्पती)

आ)मृदेचे जैविक घटक

उत्तर: सूक्ष्मजीव, उंदीर- घुशींसारखे कृदंत प्राणी, कीटक,कृमी आणि वनस्पतीची मुळे.

इ)जीवाश्म इंधन

उत्तर:पेट्रोल, डीझेल, रॉकेल/केरोसीन,पॅराफीन.

ई)हवेतील निष्क्रिय वायू

उत्तर: अरगॉन, हेलिअम,झेनॉन, निऑन, क्रिप्टॉन,रेडॉन.

उ)ओझोनच्या थरास घातक असणारे वायू.

उत्तर: क्लोरोफ्लुरोकार्बन्स आणि कार्बन टेट्राक्लोराईड.


 प्रश्न ६.वा खालील विधाने चूक की बरोबर ते सांगा.

अ) जमीन आणि मृदा एकच असते.

उत्तर: 'जमीन आणि मृदा एकच असते.' हे विधान चूक आहे.

आ)जमिनीखाली असणाऱ्या पाण्याच्या साठ्याला भूजल म्हणतात.

उत्तर: 'जमिनीखाली असणाऱ्या पाण्याच्या साठ्याला भूजल म्हणतात.' हे विधान बरोबर आहे.

इ) मृदेचा २५ सेमी जाडीचा थर तयार होण्यास सुमारे १००० वर्षे लागतात.

उत्तर: 'मृदेचा २५ सेमी जाडीचा थर तयार होण्यास सुमारे १००० वर्षे लागतात.' हे विधान चूक आहे.

ई) रेडॉनचा वापर जाहिरातींसाठीच्या दिव्यांत करतात.

उत्तर: 'रेडॉनचा वापर जाहिरातींसाठीच्या दिव्यांत करतात.' हे विधान चूक आहे.


 प्रश्न ७. वा खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दांत लिहा.

अ)मृदेची निर्मिती कशी होते हे आकृती काढून स्पष्ट करा.

उत्तर: १)जमिनीवरील मृदेची निर्मिती ही नैसर्गिक प्रक्रियेतून होते.

२) ऊन, वारा व पाऊस यांपासून निर्माण होणाऱ्या उष्णता,थंडी व पाण्यामुळे मूळ खडकांचे तुकडे होतात.

३)त्यांपासून खडे,वाळू आणि माती तयार होते.

४) या घटकांमध्ये सूक्ष्मजीव,कृमी, कीटक आढळतात. उंदीर-घुशी यांसारखे प्राणी आणि झाडांची मुळेही आढळतात त्यांच्यामुळे खडकांचा अपक्षय होतो.

५)मृदानिर्मिती होण्याची ही प्रक्रिया मंद गतीने सतत सुरु असते.

६)परिपक्व मृदेचा २.५ सेमीचा थर तयार होण्यासाठी सुमारे हजार वर्षे लागतात.

आ) पृथ्वीवर सुमारे ७१ % भाग पाण्याने व्यापलेला असून देखील पाण्याची कमतरता का भासते.

उत्तर:१)पृथ्वीच्या एकूण पृष्ठभागापैकी सुमारे ७१ % इतका भाग हा पाण्याने व्यापला आहे.

२) ७१% या एकूण पाण्यापैकी सुमारे ९७ टक्के इतके पाणी हे समुद्रामध्ये सामावलेले आहे.

३)समुद्राच्या पाण्यात क्षार जास्त असल्याने हे खारट पाणी दैनंदिन जीवनात वापरता येत नाही.

४) २.७ % इतके पाणी बर्फाच्या स्वरुपात आणि भूगर्भात सामावलेले आहे.

५) फक्त ०.३ % इतकेच गोडे पाणी पृथ्वीवर वापरायोग्य उपलब्ध आहे. त्यामुळे वाढती लोकसंख्या, जंगलांचा नाश आणि जागतिक तापमानवाढ यांमुळे गोड्या पाण्याचे स्त्रोत अपूरे पडत असल्याने पाण्याची कमतरता जाणवते.म्हणून पृथ्वीचा सुमारे ७१% इतका भूभाग पाण्याने व्यापलेला असला तरीही पाण्याची कमतरता जाणवते.

इ) हवेतील विविध घटक कोणते? त्यांचे उपयोग लिहा.

उत्तर: १) पृथ्वीभोवती असणाऱ्या वातावरणातील हवेमध्ये नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, सहा निष्क्रिय वायू (अरगॉन,हेलिअम,निऑन, झेनॉन, क्रिप्टॉन,रेडॉन ), नायट्रोजन डायॉक्साइड, सल्फर डायॉक्साइड, पाण्याची वाफ, धूलीकण,धुके, धूर इ. घटक असतात.

 *हवेतील घटकांचा उपयोग:

१) नायट्रोजन :

       सजीवांना आवश्यक प्रथिने मिळवण्यास मदत करतो. अमोनिया निर्मितीमध्ये तसेच खाद्यपदार्थ हवाबंद ठेवण्यासाठी उपयोगी असतो.

२)ऑक्सिजन: 

       सजीवांना श्वसनासाठी ज्वलनासाठी उपयोगी आहे.

३) कार्बन डायॉक्साइड : 

        वनस्पती अन्न तयार करण्यासाठी वापरतात. अग्निशामक नळकांड्यामध्ये वापरतात.

४) अरगॉन:

         विजेच्या बल्बमध्ये वापर करतात.

५) हेलिअम:  

            कमी तापमान मिळवण्यासाठी तसेच विनापंख्याच्या इंजिनावर चालणाऱ्या विमानांमध्ये वापरण्यात येतो.

६)निऑन:

        जाहिरातींसाठीच्या, रस्त्यांवरच्या दिव्यांत वापर केला जातो.

७) झेनॉन :

         फ्लॅश फोटोग्राफी मध्ये याचा उपयोग केला जातो.

८) क्रिप्टॉन:

          फ्लूरोसेन्ट पाईपमध्ये वापर होतो.

९) रेडॉन:

         कर्करोगाच्या उपचारात याचा वापर होतो.

ई)हवा,पाणी, जमीन ही बहुमोल नैसर्गिक संसाधने का आहेत?

उत्तर:  हवा,पाणी आणि जमीन या तिन्हींकडून पृथ्वीवरील सजीव जिवंत राहण्यासाठी विविध घटक मिळतात. उदा. हवेतून ऑक्सिजन- कार्बन डायॉक्साईड,जमिनींतून अन्न-पाणी- क्षार- खनिजे, इत्यादी. सजीव सृष्टीच्या मुलभूत गरजा पूर्ण होऊन ती टिकवण्यासाठी याच घटकांची मदत होते. हवा,पाणी आणि जमीन हे घटक नैसर्गिकरित्या मिळतात. म्हणूनच त्यांना बहुमोल नैसर्गिक संसाधने असे म्हणतात.

इयत्ता आठवी विषय इतिहास धडा पहिला इतिहासाची साधने रिकाम्या जागा भरा.

(१) इतिहासाच्या साधनांमधील ......... साधने आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहेत.  (अ) लिखित  ( ब ) मौखिक  (क )भौतिक  ( ड ) दृकश्राव्य २) पुण्यात...