Saturday, January 4, 2020

हे कोण गे आई? कविता १९ इयत्ता चौथी भाषा

ठाणे महानगरपालिका शाळा क्रमांक ९५ 
इयत्ता चौथी
सौ शारदा चंद्रकांत चौधरी
कविता १९ 
हे कोण गे आई ?
१) पाखरांसारखी शीळ कोण वाजवीत आहे ?
उत्तर- पाखरांसारखी शीळ वारा वाजवीत आहे.
२)कवी ( मुलगा) घाबरून का पळाला ?
उत्तर- कवीने ( मुलाने) नदीच्या थरथरत्या पाण्याला हाका मारल्या, तेव्हा त्याला प्रतिध्वनी ऐकू आल्यामुळे तो तिथून घाबरून पळाला.
३) कवितेत घडलेल्या सर्व घटना कोणामुळे घडल्या?
उत्तर- कवितेत घडलेल्या सर्व घटना वा-या मुळे घडल्या.
४)कवीने(मुलाने ) वाकुल्या (वांकोल्या) केव्हा ऐकल्या?
उत्तर- झाडाच्या सावल्या नदीच्या पाण्यात थरथरतांना कवीने (मुलाने) हाका मारल्या तेव्हा त्याने वाकुल्या (वांकोल्या) ऐकल्या.

काय ते सांगा
जांभळी - अंधारी
मोडके - देऊळ
सोनेरी -पाने 
चिंचेचे - शेंडे
वडांच्या - दाढ्या


समानार्थी शब्द

झाड - वृक्ष
हाक- साद
देऊळ - मंदिर
नदी - सरिता
पाखरू -पक्षी
सावली - छाया 


धडधडे यासारखे चार शब्द
कडकडे
खडखडे
गडगडे
फडफडे


इयत्ता आठवी विषय इतिहास धडा पहिला इतिहासाची साधने रिकाम्या जागा भरा.

(१) इतिहासाच्या साधनांमधील ......... साधने आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहेत.  (अ) लिखित  ( ब ) मौखिक  (क )भौतिक  ( ड ) दृकश्राव्य २) पुण्यात...