Sunday, September 17, 2017

श्रमदान दिन

श्रमदान दिन

श्रमाचा हा दिन सतरा सप्टेंबर
करूया  आपण  श्रमदान
शाळा परिसर स्वच्छ ठेऊ
 कष्ट करूया ते आनंदान

चांगले जगणे चांगले वागणे
स्वच्छतेशिवाय सर्व आहे उण
मनाचा ध्यास स्वच्छतेची आस
शिक्षणाची कास अंगी बाण

घडवू मुलांना शिकवू स्वच्छता
विद्यार्थी घडणे ब्रीद मनी धर
समृद्धीचा हा  करूया प्रवास
होईल जगणे सदा सुखकर

शारदा चंद्रकांत चौधरी ठाणे मनपा शाळा क्रमांक ९५

श्रमदान दिन

*श्रमदान*

श्रमदान करू अभिमान धरू
स्वच्छता आम्ही ,अंगी बाणू
संकल्प धरू मिळून काम करू
शाळा परिसर आम्ही ,स्वच्छ ठेऊ
शौचालय स्वच्छ, परिसर स्वच्छ
फिनाईलचा आम्ही वापर करू
हात स्वच्छ ठेऊ,हात स्वच्छ धुऊ
साबणाचा आम्ही हा वापर करू
दोन हातांनी सदा काम करू
श्रमदानाचे महत्त्व पटवून देऊ
   

शारदा चंद्रकांत चौधरी ठाणे मनपा शाळा क्रमांक ९५
.

पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा सराव अलंकार

  अलंकार  https://youtu.be/CQKaX7p47UA?feature=shared