Friday, May 26, 2017

पाऊस पडतो ( अभंग)

पाऊस पडतो| ढग हा गर्जतो
धरतीचे मन | सुखावते
जमिन भिजते| सर्वांग सुंदर
मन होई तिचे |ओढ घेते
गाती झाडे पक्षी | गाणेही सुंदर
वेली लता वाढे| भरभर
फुले फळे येती|मधूर सुंगंध
पसरतो जगी| चोहिकडे
मन हे सुंदर | जग हे सुंदर
होईल हे जग | सामर्थ्याने

सौ.शारदा चौधरी ठाणे मनपा शाळा क्रमांक ९५

जीवनाचा खेळ

जीवनाचा खेळ| आयुष्याचा मेळ
परि सुख नाही | सर्वार्थाने
अंतरिचे मन| जाणिव नेणिव
जगी नाही खूण|कोणाचीही
करूया नमन| अशा जगण्याला
घालवू आयुष्य|  परिपूर्ण
जगावे सुंदर | मन हे सुंदर
करूया सार्थक | जीवनाचे
एेसे जिविताचे|मिळेल हे फळ
लागेल अविट | सत्कर्माने

सौ.शारदा चौधरी ठाणे मनपा शाळा क्रमांक ९५

पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा सराव अलंकार

  अलंकार  https://youtu.be/CQKaX7p47UA?feature=shared