Sunday, November 13, 2016

बालदिन

*बालदिन*
बाळा आला आलारे बालदिन आलारे
मौज करा करारे बालदिन आलारे
गुलाबाची फुले हे आवडे नेहरूंना
तुम्ही तशीच मुले सांगे अपुल्या जयंतीला
खेळा नाचा तुम्ही रे भरारी घ्या आकाशाला
जीवनआनंद लुटारे सांगू अपुल्या मनाला
छोटे होऊनी पहारे खेळ हा मनीचा
सांगे बालपण अपुले हा जिवनाचा ठेवा
स्वप्नी रंगतो आपण आठवे बालपण
हसू खुदकन येते रे सांगते कवीमन
म्हणून म्हणते आनंद हा मौज लुटारे
बाळा आला आलारे बालदिन आला
         सौ शारदा चंद्रकांत चौधरी
          ठाणे मनपा शाळा क्रमांक ९५

पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा सराव अलंकार

  अलंकार  https://youtu.be/CQKaX7p47UA?feature=shared