विज्ञान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
विज्ञानाची कास धरा.
जगाकडे डोळस पणाने पहा.
अंधश्रध्देला थारा देऊ नका.
Friday, February 26, 2016
मराठीराजभाषादिन लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्म जात पंथ एक मानतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी बोलतो मराठी ऐकतो मराठी जाणतो मराठी मानतो मराठी मराठी राजभाषा दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
विद्यार्थ्याना एका मिनिटात गोळे काढायला सांगणे.
वेळ झाली की त्यांना थांबायला सांगायचे नंतर काढलेले गोळे मित्रांना मोजायला सांगणे संख्या वाचता व लिहिता येते का ते समजते.
खेळातूनआनंद
एकाने 1 म्हटला की दुस-याने 2 म्हणायचे तिस-याने 3 म्हणायचे याप्रमाणे
क्रमाने मुलांना 1,2,3,4...........म्हणायला सांगायचे .विद्यार्थ्याचे लक्ष नसेल तर त्याला पुढचा क्रम आठवणार नाही .मग त्याला पक्ष्याचा आवाज किंवा त्याला आवडणारा आवाज काढायला सांगायचे किंवा कविता ,गाणी,हावभाव ,नकला करायला सांगायचे .
सारेगमपदनिसा
सा -साखर रवी विनायक कमल लहान नदी दीन नंबर रस सवड डबा बाजू जून नस समज जहाज जमीन नथ थवा वास सज्जन नको कोनमापक कवठ ठसा सायकल लाल लबाड डफ फणस समई ईश्वर रकाना नाव वजन नकळत तर रक्कम मगर रफार रवा वारा राजा जाग गवत तट टरबूज जप पतंग गवार रग गर
शाबासकी
शाबासकीची एक थाप विद्यार्थ्याच्या जीवनाला नवीन दिशा देते.त्याच्या चेह-यावरील आनंद गगनात मावत नाही .लहान मुले निरागस असतात त्यांच्या चेह-यावरील भाव शिक्षकाला ओळखता आले पाहिजे.