Saturday, July 8, 2023

इयत्ता आठवी विषय इतिहास धडा पहिला इतिहासाची साधने रिकाम्या जागा भरा.

(१) इतिहासाच्या साधनांमधील ......... साधने आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहेत. 


(अ) लिखित 


( ब ) मौखिक 


(क )भौतिक 


( ड ) दृकश्राव्य


२) पुण्यातील ......... या गांधी स्मारक संग्रहालयात गांधीजींच्या इतिहासाविषयी माहिती मिळते.


अ) आगाखान पॅलेस

ब) साबरमती आश्रम 

क)  सेल्युलर जेल

ड) लक्ष्मी विलास पॅलेस


३) विसाव्या शतकातील आधुनिक तंत्रज्ञानाचा एक आगळा अविष्कार म्हणजे....... होय.

(अ) पोवाडा 

(ब )छायाचित्र 

(क) मुलाखती 

( ड ) चित्रपट


४) अंदमान येथील सेल्युलर जेलला भेट दिल्यावर ......... यांच्या क्रांतिकार्यविषयी माहिती मिळते.


(अ) वासुदेव बळवंत फडके

(ब) उमाजी नाईक 

(क )स्वातंत्र्यवीर सावरकर 

(ड )भगतसिंग


५) ......... या साधनाचा समावेश दृकश्राव्य साधनात होतो.

(अ) ध्वनीमुद्रिते 

(ब )चित्रपट 

(क )छायाचित्रे

 (ड )स्फूर्ती गीते


६) ......यांच्या निबंधमालेमधून तत्कालीन विविध सामाजिक व सांस्कृतिक विषयावर केलेले भाष्य वाचायला मिळते. 


(अ) कृष्णशास्त्री चिपळूणकर 

(ब )विष्णुशास्त्री चिपळूणकर 

(क ) लोकमान्य टिळक 

(ड )गोपाळ हरी देशमुख


७) लोकहितवादी उर्फ गोपाळ हरी देशमुख यांनी........ या साप्ताहिकातून शतपत्रे लिहिली.


(अ) ज्ञानोदय 

(ब) ज्ञानप्रकाश 

( क) प्रभाकर  

 (ड ) दीनबंधू


८ ) दलित वर्गाच्या जागृतीसाठी....... पोवाड्यांची रचना करून ते सादर केले. 

(अ) आर्य समाजाने 

(ब) समाजाने 

(क)ब्राह्मण समाजाने

( ड) प्रार्थना समाजाने




९) रवींद्रनाथ टागोर यांनी गायलेल्या ........या गीताची ध्वनिफीत आधुनिक भारताच्या इतिहासाच्या अभ्यासात श्राव्य साधन म्हणून उपयोगी पडते.

(अ) वंदे मातरम

(ब) झंडा ऊँचा रहे हमारा

(क) जनगणमन 

(ड) सारे जहासे अच्छा



१० ) ऐतिहासिक साधनांचे जतन केल्यामुळे इतिहासाचा समृद्ध वारसा आपल्याला ........सोपवता येईल.

(अ) शासनाकडे 

(ब) सामाजिक संस्थांकडे 

(क) इतिहास संशोधकांकडे  

(ड) भावी पिढ्यांकडे

Saturday, June 17, 2023

वाक्प्रचार व अर्थ


१) डोळा लागणे (झोप लागणे)

२) डोळा मारणे (इशारा करणे)

३) डोळा चुकवणे (गुपचूप जाणे)

४) डोळे येणे (नेत्रविकार होणे)

५) डोळे जाणे (दृष्टी गमावणे)

६) डोळे उघडणे (सत्य उलगडणे)

७) डोळे मिटणे (मृत्यू पावणे)

८) डोळे खिळणे (एकटक पाहणे)

९) डोळे फिरणे (बुद्धी भ्रष्ट होणे)

१०) डोळे दिपणे (थक्क होणे)

११) डोळे वटारणे (नजरेने धाक दाखवणे)

१२) डोळे विस्फारणे (आश्चर्याने पाहणे)

१३) डोळे पांढरे होणे (भयभीत होणे)

१४) डोळे भरून येणे (रडू येणे)

१५) डोळे भरून पाहणे (समाधान होईपर्यंत पाहणे)

१६) डोळे फाडून पाहणे (आश्चर्याने निरखून पाहणे)

१७) डोळे लावून बसणे (वाट पाहात राहणे)

१८) डोळेझाक करणे (दुर्लक्ष करणे)

१९) डोळ्यांचे पारणे फिटणे (पूर्ण समाधान होणे)

२०) डोळ्यात प्राण आणणे (आतुरतेने वाट पाहणे)

२१) डोळ्यात धूळ फेकणे (फसवणूक करणे)

२२) डोळ्यात तेल घालून बघणे (लक्षपूर्वक पाहणे)

२३) डोळ्यात डोळे घालून पाहणे (एकमेकांकडे प्रेमाने बघणे)

२४) डोळ्यात सलणे/खुपणे (दुसऱ्याचं चांगलं न बघवणे)

२५) डोळ्यात अंजन घालणे (दुसऱ्याला परखडपणे त्याची चूक दाखवून देणे)

२६) डोळ्यांवर कातडे ओढणे (जाणूनबुजून दुर्लक्ष करणे)

२७) डोळ्याला डोळा नसणे (काळजीमुळे झोप न लागणे)

२८) डोळ्याला डोळा भिडवणे (नजरेतून राग व्यक्त करणे)

२९) डोळ्याला डोळा न देणे (अपराधी भावनेपोटी एखाद्याच्या नजरेस नजर न मिळवणे)

३०) दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसणे ; पण स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ न दिसणे ( दुसऱ्याची छोटीशी चूक दिसणे ; पण स्वतःची मोठी चूक न दिसणे। )


इयत्ता आठवी विषय इतिहास धडा पहिला इतिहासाची साधने रिकाम्या जागा भरा.

(१) इतिहासाच्या साधनांमधील ......... साधने आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहेत.  (अ) लिखित  ( ब ) मौखिक  (क )भौतिक  ( ड ) दृकश्राव्य २) पुण्यात...